Total Pageviews


पतंजलि परिवार तालुका संगमनेर जि.अहमदनगर, महाराष्ट्र, यांची अधिकृत वेब साईट

वेब साईट संचलन व नियंत्रण प्रा. विजय देशमुख, संयोजक, 'भारत स्वाभिमान' संगमनेर.

Astang yog founder Rushi Patanjali

Astang yog founder Rushi Patanjali
Yogen chittasya paden vachya, malam sharirashya chya vaideken Yopam karotwam pravaram muninam, Patanjalim Pranjali prantosmi. ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि, धीयो यो न: प्रचोदयात् । ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् ॐ सहना ववतु सहनौ भुनक्तु सहविर्यम् करवावहे तेजस्विना वधीतम् अस्तु मा विद विशावहै ॐ असतो मा सद् गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:|

Oct 13, 2010

Milk Adultration Scandal in Ahmednagar

सावधान पिशवीमधील दूध आपल्यासाठी विष असू शकते ! नुकतेच नगर जिल्ह्यातील भेसळयुक्त दुधाच्या बातमीने सर्वांच्या तोंडाचे पानी पलाले, कारन याच भेसळउक्त दुधाचा पुरवठा अनेक नामवंत दूध डेअरीना होत होता, की ज्यांचे दूध आपण मोठ्या विश्वासाने वापरत आहोत. मागील दोन चार वर्षापूर्वी अशीच बातमी वर्त्तमानपत्रात आलीं होती की अहमदनगर येथे एका गोदावूनवर छापामारण्यात आला तेंव्हा तिथे कित्तेक टन दुधात भेसळ करण्यासाठी उपयोगात येणारी सफ़ेद पावडरचा साठा सापडला आणि आस्च्यार्याची गोष्ट म्हणजे या पावडरचा पुरवठा नगर जिल्ह्यातील अनेक नामवंत दूध डेअरिला केल्याचे पुरावे (डेलिवेरी चलन) सुद्धा मिळाले परन्तु यावर पुढे फारसे काहीही न होता सर्व गोस्टीवर पडदा पडला. या वेळी पण असेच दुधात भेसळ करण्यासाठी आवश्यक पावडरचा जो साठा पोलिसानी जप्त केला ती पावडर नेमकी काय आहे ? चव आणी गंध विरहित मेलामाईन नावाची ही पांढरी पावडर असून चीन मधून मोठ्या प्रमाणात ही भारतात येते. कृत्रिम रित्या दुधामधिल प्रोटीन चे प्रमाण वाढविने साठी हिचा वापर करतात. दुधामध्ये पानी घातल्यावर त्यातील स्निग्ध व प्रथिनाचे प्रमाण कमी होते. यासाठी कृत्रिम रित्या रासायनिक पदार्थ घालून या पानी घातलेल्या दुधातील स्निग्धाश व प्रथिने हव्या त्या लेव्हल पर्यंत वर नेतात. चीन मध्ये २००७ साली अशा भेसळयुक्त दूध विक्रीला सुरुवात झाली. या प्रकारच्या दुधापासून मोठ्या प्रमाणात विष बाधा व गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आल्याने चीन सरकारने ३ महिन्याच्या आत दोषींवर कारवाई करून त्याना फाशीची शिक्षा दिली. आपल्या दुर्दैवाने चीनमधे या मेलामाईन पावडरचे पूर्वी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले व तीचे फार मोठे साठे तेथे पडून आहेत. या पावडर चे भेसळ प्रमानानुसार कमी अधिक तीव्रतेने जवळपास १५ प्रकारच्या गंभीर आजाराना आमंत्रण मिळते. या बाबींचा सखोल तपशील अंगावर शहारे आननारा आहे. तात्पर्य सामान्य मानसाना या भेसळ बाबत फारसे समजत नसल्यामुले पुढारी हे प्रकरण दाबतात. सापडलेली पावडर गायब करून चोरांच्या उलट्या बोंबा. म्हणतात की, " कमी प्रतीची पावडर वापरली म्हणजे फार काही मोठा गुन्हा झाला नाही, उगाच कोणी या घटनेचा गैरफायदा घेउन आमच्या दूध धंद्याची बदनामी करू पाहत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, आमच्या असंख्य शेतकरी बांधवांच्या जीवनाच्या प्रश्नाशी कोणी खेलू नाही". बघा आहेत की नाही चोराच्या उलट्या बोंबा. पुन्हा शेतकराच्या आड़ लपायला तयार. लवकरच कृष्ण प्रकाश किवा सिंग बाईची बदली झाली तर नवल वाटायला नको. स्वामी रामदेव बाबा म्हणतात भेसळ वाल्याला, बलात्कार करनाराला, भ्रस्टाचाराला व देशद्रोही आणि अतिरेकी याना फाशिचीच शिक्षा पाहिजे.